Beed, Pali Dam saam tv
महाराष्ट्र

Beed : ग्रामस्थांना पाली धरणात आढळला नेकनूरच्या युवकाचा मृतदेह

आज नेकनूर ग्रामस्थांनी शोधकार्य सुरु ठेवले हाेते.

विनोद जिरे

Beed News : बीड (beed latest news) शहरालगत असणाऱ्या पाली येथील धरणात (dam) एका युवकाचा (youth) मृतदेह आढळला आहे. गेल्या तीन दिवसांपासून युवक बेपत्ता होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे. केशव भिकाजी काशीद (रा. नेकनूर हल्ली मू बार्शी नाका, अशोकनगर, बीड) असे मृताचे नाव आहे.

पाली येथील धरणाच्या काठावर पँट, आधार कार्ड, घड्याळ व 75 रुपये ठेवून केशव हा गायब झाला होता. त्याचा आठ फेब्रुवारीपासून शोध लागलेला नव्हता. मात्र अखेर आज त्याचा मृतदेह पालीच्या धरणात नेकनूर ग्रामस्थांच्या (villagers) निदर्शनास आला.

मयत केशव काशीद हा मूळचा नेकनूर येथील आहे. ताे सध्या बीडमध्ये मामाकडे राहयला हाेता. सात फेब्रुवारीला मामा व त्यांचे कुटुंबीय हैदराबादला गेले होते. त्यानंतर केशव कोठे गेला ? त्याचे काय झाले ? याचे रहस्य कायम होते.

आठ फेब्रुवारीला पाली येथील तलावाच्या काठी त्याची पँट, त्यात आधार कार्ड, घड्याळ असे साहित्य पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळले होते. त्यानंतर आज नेकनूर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्यांना केशवचा मृतदेह दिसून आला. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT