Beed Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime News: मोबाईल चोरीची तक्रार दिल्याने तरुणाची निर्घृण हत्या, बीड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु!

Latest Crime News: याप्रकरणी पोलिसांनी (Beed Police) दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beed News: मोबाईल चोरीची (Mobile theft) तक्रार दिल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये (Beed News) ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Beed Police) दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहराच्या जवळ एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या शुल्लक कारणावरुन या तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. अक्षय राजेंद्र मडकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बिंदुसरा तलावाजवळ अक्षयची हत्या करण्यात आली होती. रोहण प्रकाश जाधव आणि वैभव क्षीरसागर या तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. रोहण आणि वैभव हे दोघेही अक्षयचे खास मित्र आहेत. पोलिस तपासात शुल्लक कारणावरुन मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर येताच सर्वांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्यामुळे सुरुवातीला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणे खूपच अवघड झाले होते. सध्या रोहन आणि वैभव हे दोन्ही आरोपी फरार आहेत. दोघांविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT