Transgender Marriage Beed Saam TV
महाराष्ट्र

...अखेर बीडमधील तरुणाचा तृतीयपंथीशी विवाह संपन्न, राज्यात चर्चा...

काही दिवसापासून बीडसह राज्यभरात हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा होती. आज प्रत्यक्षात हा विवाह सोहळा पार पडला आहे.

विनोद जिरे

बीड: राज्यात चर्चा सुरू असणारा विवाह सोहळा, आज अखेर बीडमध्ये पार पडला आहे. बीड शहरातील हलगी वादक असणारा बाळू धुताडमल आणि किन्नर सपना यांनी, समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या भिंतीला चिर देत, अनोखा निर्णय घेत, ते विवाह बंधणात अडकले आहेत.

आज-काल अनेक तरुण तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहतात. मात्र दोघांमधील विचार आणि मतभेदांमुळे त्यांचं हे नातं, काही महिने किंवा वर्षात तुटून गेल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीडमध्ये (Beed) वास्तव्यास असणारा बाळू धुताडमल हा तरुण किन्नर सपना सोबत गेल्या अडीच वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहतो आहे. यादरम्यान त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. काल त्यांचा हळदी समारंभ देखील पार पडला आणि आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. एकीकडं समाजात तृतीयपंथी (Transgender Marriage Beed) व्यक्तींना, त्यांच्या समाजाला हिनवलं जातं. मात्र दुसरीकडे बाळूने तृतीयपंथी असणाऱ्या सपनाला पत्नीचा दर्जा दिला आहे.

काही दिवसापासून बीडसह राज्यभरात हा विवाह सोहळा होणार असल्याची चर्चा होती. आज प्रत्यक्षात हा विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्याला बीड जिल्ह्यातील (Beed District) प्रतिष्ठीत व्यक्तींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळं या विवाह सोहळ्याला सर्वांनी जणू काही पाठिंबा दर्शवला आहे, असं चित्र दिसून आलं आहे. तर यावेळी सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी कन्यादान केलं.

यावेळी रीतीरिवाजाप्रमाणे या दोघांचा, आज विवाह सोहळा बीड शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पार पडला. पहिल्यांदा परण्या निघाला आणि यामध्ये मनसोक्त पणे तृतीयपंथी सपनाच्या मित्रमंडळींनी ठेका धरला. सपना आणि बाळू मंडपात आले आणि त्यांचा विवाह सोहळा सर्व परंपरा पार पाडत संपन्न झाला. खरंतर तृतीयपंथी व्यक्तीचा विवाह होईल अशी अपेक्षाच नव्हती, मात्र आज विवाह झाला याचा आम्हाला आनंद असल्याचं बाळू आणि सपना या दोघांनी सांगितलं.

दरम्यान समाजात आजही किन्नर या समाजाला हिनवलं जातं, त्यांना स्वीकारण्यापेक्षा त्यांच्याकडं पाहून नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय घेतला. काल दोघांचा हळदी समारंभ पार पडला होता. तर आज अखेर हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा विवाह सोहळा झाला खरा, मात्र किन्नर सपनाला हा समाज महिला म्हणून स्वीकारणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT