प्रणयक्रीडा करणाऱ्या सापांना पकडणं जीवावर बेतलं; सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू! SaamTvNews
महाराष्ट्र

प्रणयक्रीडा करणाऱ्या सापांना पकडणं जीवावर बेतलं; सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू!

रात्री १० वाजेच्या सुमारास अतिविषारी मण्यार जातीच्या नर व मादीची प्रणयकिडा सुरु असताना राजुने सापांना पकडण्याचे वेडे धाडस केले.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धामणगांव येथील 22 वर्षीय राजू वसंता महाले या युवकाचा सापाला पकडण्याच्या मोहापायी सर्पदंशामुळे दुर्देवी मृत्यु झाला आहे. राजु नामक युवकाच्या राहत्या घरा समोर मासरुळरोडवर रात्री १० वाजेच्या सुमारास अतिविषारी मण्यार जातीच्या नर व मादीची प्रणयकिडा सुरु असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले.

हे देखील पहा :

उपस्थित नागरिकांमधील राजुने सापांना पकडण्याचे वेडे धाडस केले. परंतु साप पकडण्याच्या प्रयत्नात सापांनी सदर युवकास चार ठिकाणी चावा घेतल्यामुळे, सापाचे विष राजुच्या पूर्ण शरीरात भिनले.

उपस्थित नागरिकांनी राजुला दवाखान्यात दाखल केले असता, उपचारा दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. उपस्थित नागरिकांकडून प्राप्त माहिती नुसार राजुने सापांना पकडण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT