Crime : नोकरीच्या आमिषाने जमीन दान केली; फसवणूक झाल्याने तरुणाने आत्महत्या केली! राजेश काटकर
महाराष्ट्र

Crime : नोकरीच्या आमिषाने जमीन दान केली; फसवणूक झाल्याने तरुणाने आत्महत्या केली!

नोकरीच्या आमिषाने एका युवकाने संस्थाचालकाला जमीन दान केली. मात्र, वारंवार विनंती करूनही नोकरी न लागल्याने तणावग्रस्त होऊन या युवकाने आत्महत्या केल्याची घटना परभणीत घडली आहे.

राजेश काटकर

परभणी : परभणीच्या पालम तालुक्यातील शेखराजूर गावातील एका 37 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. नारायण किशनराव पवार असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

हे देखील पहा :

शेख राजूर येथील अंध व मूकबधिर शाळेचे संचालक विठ्ठल संभाजी गुट्टे यांनी 2006 मध्ये मयताला शाळेवर सेवक म्हणून तर मयताच्या पत्नीला स्वयंपाकी म्हणून लावतो असे आमिष दाखवले होते. असे त्याने लिहलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे.

या अमिषापोटी मयताने संस्था चालकाला जमीन दान केली होती. वारंवार मागणी करून देखील नोकरी मिळत नसल्याचे या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. मयताच्या पत्नीच्या तक्रारी वरून संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT