मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानं तरुणाला विवस्त्र करून मारहाण ! Saam Tv
महाराष्ट्र

मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानं तरुणाला विवस्त्र करून मारहाण !

गावातील मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानं एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या तीसगाव तांडा येथे घडली आहे.

माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : गावातील मुलीसोबत प्रेमविवाह केल्यानं एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यातील खुलताबाद Khultabad तालुक्यातल्या तीसगाव तांडा येथे घडली आहे. Young man beaten for having love affair with a girl

हे देखील पहा-

याप्रकरणी खुलताबाद तालुक्यात केवळ NC दाखल करण्यात आली आहे. विवस्त्र करून जबर मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. किशोर साहेबराव चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वी किशोर साहेबराव चव्हाण यांनी गावातील एका मुलीसोबत प्रेम विवाह केला होता. त्यानंतर तो गाव सोडून कन्नड Kannad येथे राहत होता.

दोन जुलै रोजी आईला भेटण्यासाठी तो गावात आला. त्यावेळेस गावातील मुलीच्या नातेवाईकांनी त्याला पकडून विवस्त्र केले आणि बेदम मारहाण केली. त्यात तो प्रचंड जखमी झाला आहे. मरणासन्न अवस्थेत त्याला गावाच्या बाहेर टाकून देण्यात आले, नातेवाईकांना कळल्यानंतर खुलताबाद येथे उपचासाठी दाखल करण्यात आले आहे.

उपचारानंतर तो परत कन्नड येथे गेला. विवस्त्र करून मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी खुलताबाद पोलीसानी कोणत्याही आरोपीवर कारवाई सुद्धा केलेली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

Avocado Benefits: हृदयापासून त्वचेपर्यंत फायदेशीर 'हे' एक फळ; जाणून घ्या ७ फायदे आणि कसे खावे

SCROLL FOR NEXT