मित्रांनो माफ करा, गुडबाय करण्याची वेळ आलीय; FB पोस्ट टाकत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न Saam Tv
महाराष्ट्र

मित्रांनो माफ करा, गुडबाय करण्याची वेळ आलीय; FB पोस्ट टाकत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - 'मित्रांनो माफ करा, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली आहे, चांगलं काम करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो' अशी फेसबुक पोस्ट Facebook Post करून नागपूरात एका तरुणाने आत्महत्येचा Suicide प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

योगेश नासरे असे या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो नागपूरच्या Nagpur मेडिकल या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आरोग्य सेवक म्हणून काम करतो. रुग्णालयात आलेल्या गरीब रुग्णांना दाखल करून घेणे, त्यांच्या नातेवाईकांना योग्य माहिती देणे, हे काम तो मोफत करतो. त्याच्या या कामामुळे अनेक संघटनांनी त्याला पुरस्कृत केलं आहे.

हे देखील पहा -

मात्र, आज अचानक त्यानं 'मित्रांनो माफ करा, जगाला गुड बाय करण्याची वेळ आलीय, चांगलं काम करणाऱ्याला खुप त्रास सहन करावा लागतो, अशी फेसबुक पोस्ट टाकली. तसंच 'मी थोड्या वेळात फुटला तलावावर लाईव्ह येत आहेअसेही टाकले याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीसांनी फुटाळा तलावात पोलीस बंदोबस्त वाढवला. परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना तयार ठेवले.

हा तरुण तलावाजवळ आल्यावर त्याला पोलीस दिसताच त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. मात्र, तोवर त्याने कीटकनाशक प्राशन केले. पोलिसांनी लागलीच त्याला रुग्णालयात दाखल केले, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, आरोग्य सेवा करणाऱ्या तरुणाला आत्महत्या करेपर्यंत कोणी त्रास दिला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना बोनसची भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Maharashtra News Live Update: नंदुरबार बाजार समितीत कापूस खरेदीला सुरुवात

SCROLL FOR NEXT