bhandara News  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : लग्नाच्या आदल्या दिवशी डॉक्टर तरुणाने संपवलं जीवन, कुटुंबियांच्या मनात प्रश्नांचं काहूर

डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय 35 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत घोरमारे

Bhandara News : लग्नाच्या आदल्या दिवशी तरुण डॉक्टरने आपल्या राहत्या घरी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा शहरातील स्नेहनगरमध्ये ही घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. कुणाल भाऊराव चव्हाण (वय 35 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव आहे. नागपूर मेयो रूग्णालयात कुणाल कर्तव्यावर होते.

जानेवारी महिन्यात डॉ. कुणाल यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील दंत वैद्यकीय तरूणीशी लग्न जमले होते. 4 एप्रिल लग्नाची तारीख ठरली होती. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. काल सकाळी झोपून उठल्यानंतर कुणालने चहा घेतला आणि परत आपल्या खोलीत गेला. परंतु बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याचे वडिलांनी खोलीत जाऊन बघितले त्यावेळी त्यांना धक्का बसला. (Latest Marathi News)

कुणालने पंख्याला गळफास घेतला होता. कुटुंबाने तातडीने दोरी कापून कुणालला खाली उतरवले. त्यानंतर घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

कुणाल यांचे वडील हे निवृत्त सरकारी आहेत तर आई शिक्षिका आहे. कुणाल अभ्यासात हुशार असल्याने सुरुवातीपासूनच त्यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले. आई-वडिलांनीही त्यांच्या स्वप्नापूर्तीसाठी पूर्ण प्रयत्न केले.

मात्र एका हुशार डॉक्टरने अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशी एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आनंदात असणारं घर क्षणात शोकसागरात बुडालं आहे. दुसरीकडे सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या वधूचे स्वप्न क्षणार्धात विस्कळीत झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT