Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! २ प्रमुख योजना कायमच्या बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय आहे मुख्य कारण?

Maharashtra government latest decisions : महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण विभागाच्या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. योजनांवर अनेक वर्षे निधी खर्च झालेला नव्हता.

Namdeo Kumbhar

Maharashtra education department news : देवेंद्र फडणवीस सरकारकडून शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या २ योजना कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 'पाठशाळा आणि संस्कृत विकासासाठी अनुदाने' आणि 'इतर विशेष शाळा' या दोन योजनांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून या योजनांवर कोणताही निधी खर्च झालेला नव्हता आणि त्यांचा प्रत्यक्ष वापरही होत नव्हता. त्यामुळे योजनांचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने सरकारने या योजना अधिक्रमित (बंद) करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजना का बंद करण्यात आल्या?

राज्यात बदलत्या शैक्षणिक व प्रशासकीय परिस्थितीनुसार उपलब्ध निधीचा योग्य आणि परिणामकारक वापर व्हावा, यासाठी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार ३ ऑगस्ट रोजी कल्याणकारी योजनांची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नेमकं काय समोर आले?

पाठशाळा व संस्कृत विकास या योजनेअंतर्गत २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत एक रुपयाचाही खर्च झालेला नाही. इतकेच नाही तर २०१७-१८ पासून या योजनेसाठी एकही नवा प्रस्ताव प्राप्त झालेला नव्हता. तर इतर विशेष शाळा या योजनेअंतर्गत २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत कसलाही निधी खर्च झाला नाही.

उपयोगिता संपल्याने निर्णय:

या दोन्ही योजनांची दीर्घ काळापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. तसेच यांच्याशी जुळणाऱ्या इतर अनेक योजना सध्या कार्यरत आहेत. सध्याच्या काळात या योजनांची गरज आणि उपयोगिता मर्यादित राहिल्याने, राज्य सरकारने या दोन्ही योजना अधिक्रमित करून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : ट्र्क आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात ७ कामगारांचा मृत्यू,२० जण गंभीर

Sleeping Pillow Benefits : पायांच्या मध्ये उशी ठेवून झोपण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, शरीरात वेदना कधी जाणवणारच नाही

Chocolate Cold Coffee: सुट्टीच्या दिवशी लहान मुलांसाठी घरीच बनवा कॅफेस्टाईल चॉकलेट कोल्ड कॉफी, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई! संसद मार्ग परिसरातून अनेकांना घेतले ताब्यात; राजधानीत तणाव वाढला

DA Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ; आता थेट 'इतका' वाढून मिळणार पगार

SCROLL FOR NEXT