yogesh wadal of vanchit bahujan aghadi wins in akola zp by election saam tv
महाराष्ट्र

Akola ZP By-Election Result: अकोला जिप पोटनिवडणुकीत 'वंचित'ने राखला गड, योगेश वडाळ विजयी

चोहोट्टा जिल्हा परिषद सर्कलमध्ये याआधीही वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News :

अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत (akola zilla parishad by election) वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ (yogesh wadal) हे चोहोट्टा जिल्हा परिषद सर्कलमध्ये विजयी झाले आहेत. वडाळ यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप (bjp) आणि शिवसेना (shivsena) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. वडाळ यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमाेजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण केली. (Maharashtra News)

काही महिन्यांपूर्वी अकोला जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांचे निधन झाले. त्यांच्या चोहोट्टा जिल्हा परिषद सर्कल जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत वंचितचेच उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ ३७८१ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गजानन नळे यांचा १३९४ मतांनी पराभव झाला. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार गोपाल म्हैसने यांना ११६० मते मिळाली.

अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल

योगेश वडाळ (वंचित) - ३७८१ मते.

गजानन नळे (भाजप) - २३८७

जीवन खवले (प्रहार) - १७६५

गोपाल म्हैसने (उबाठा) - ११६०

रवींद्र अरबट (काँग्रेस) - ७९५

नोटा - १२१

वंचित बहुजन आघाडीचे योगेश वडाळ १३९४ मतांनी विजयी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray vs Shinde: शिंदे 'नरकासूर'; नरक चतुर्दशीनिमित्त उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर विखारी टीका

नवी मुंबईत पालिका निवडणुकीआधी शरद पवार गटात नाराजी उफाळली; आधी बंडखोरी, आता आमलेंना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Bacchu Kadu: आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा; बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Tuesday Horoscope : लक्ष्मीची विशेष कृपा होणार; ५ राशींच्या लोकांची भरभराट होईल, तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT