Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये योगदिवस साजरा; नागपूर विद्यापीठाचा अभिनव उपक्रम

महामेट्रो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

मंगेश मोहिते

नागपूर - स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात सुरु होणारा शताब्दी महोत्सव तसेच यंदाच्या खेलो इंडिया विद्यापीठ योगासन स्पर्धेत नागपूर (Nagpur) विद्यापीठाचे सुवर्ण कामगिरीचे औचित्य साधून यंदाचा जागतिक योग दिवस धावत्या मेट्रोत (Metro) साजरा करण्यात आला. महामेट्रो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

या अभियानाचा प्रारंभ फ्रीडम पार्क झिरो माईल येथून करण्यात आला. या कार्यक्रमास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर आणि मेट्रोचे प्रकल्प महाव्यवस्थापक सुधाकर उराडे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्ताने ७५ मिनिटे ‘योगा ऑन व्हील' अशी थीम या कार्यक्रमाची होती. विद्यापीठाच्या विविध प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे नामवंत खेळाडू, शहरातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, अर्जुन पुरस्कार प्राप्त, रासेयोचे स्वयंसेवक, विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी, विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच सहा ते ६० वर्षापर्यंतच्या नागरिकांची उपस्थिती यावेळी होती.

हे देखील पाहा -

तर दुसरीकडे कस्तुरचंद पार्क येथे आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमा दरम्यान बोलताना गडकरी म्हणाले, 'आज आपण ८ वा योग दिवस साजरा करत आहोत, दोन वर्षे हा दिवस साजरा करता आला नाही. आपल्याला करता आलं नाही. पंतप्रधानांची ही संकल्पना दूर पर्यंत पोहचली.

ते पुढे म्हणाले, 'अनेक देशात योग पोहचला आहे. मी रोज एक तास योग करतो त्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहतं. योग सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तसंच सगळ्या प्रदूषणापासून (Pollution) मुक्ती मिळावी, स्वच्छ पाणी मिळावे, चांगले गार्डन असावे ज्याचा वापर नागरिकांना करता यावा. देशात योगाचा प्रचार करणाऱ्यांना विदेशात मोठ्या प्रमाणात सन्मान आहे. आपण नियमित योग करण्याचा संकल्प करू असही ते म्हणाले.

माझी आईसुद्धा योग प्रसारच काम करत होती. माझी तब्बेत बिघडली तेव्हापासून मी याकडे वळलो आणि योग करायला लागलो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मला एका कार्यक्रमात विचारल, 'तुम्ही काय करता, तुमचं वय १० वर्ष कमी वाटतं, मी त्यांना सांगितलं मी योग करतो.' असा किस्सा देखील त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

तसंच अनेक भारतीय विदेशात योगाचे धडे देतात त्यातून त्यांची कमाई सुद्धा होते. सगळ्यांनी रोज योगा केला तर स्वास्थ चांगलं राहील असा सल्लाही त्यांनी योग दिनानिमित्त उपस्थित नागरिकांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

Summer AC Settings: उन्हाळ्यात AC कितीवर ठेवला पाहिजे? लाईटबिल होईल अर्ध

IPLनंतर टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल; ५ नव्या खेळाडूंची होणार एंट्री, दिग्गजांना मिळणार डच्चू?

SCROLL FOR NEXT