येलदरी, सिद्धेश्वर आणि ईसापुर 98 टक्क्यांवर; गावांना सतर्कतेचा इशारा  संदीप नागरे
महाराष्ट्र

येलदरी, सिद्धेश्वर आणि ईसापुर 98 टक्क्यांवर; गावांना सतर्कतेचा इशारा

मराठवाड्यात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस बरसत आहे

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : मराठवाड्यात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस बरसत आहे. मागील १० वर्षात पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात गायब होणारा पाऊस अचानक हजेरी लावत असल्याने, सगळीकडे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. या पावसाने हिंगोली जिल्ह्यातील लघुसिंचन आणि जलसंधारण विभागाचे जिल्ह्यातील लहान मोठे 51 तलाव भरले आहेत.

तर, जिल्ह्यातील तीन पैकी दोन धरणे मागील १० दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाली आहेत. येलदरी सिद्धेश्वर नंतर आता ईसापुर धरण ही शंभर टक्के भरले, दुपारी 12.30 वाजता पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत, इसापूर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हे देखील पहा-

धरणातील अनावश्यक पाणीसाठा, पैनगंगा नदीत विसर्जित करण्यासाठी धरण प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग झाल्यास या नदीपात्रात पूरस्थिती निर्माण होऊन, नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून १२.३० वाजता पाणी सोडणार आहेत. दोन दरवाजे 20 सेंटिमीटर उघडले जाणार आहेत.

साधारणतः दीड हजार क्‍युसेक पाणी सोडले जाणार आहे. यामुळे नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना जिल्हाधिकाऱ्यांना, काल सायंकाळी धरण प्रशासनाने लेखी पत्र देत तातडीने सूचना दिल्या आहेत. या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्क देखील करण्यात आले आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानंतर नागरिकांनी आपली जनावरे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन या पत्रकामार्फत करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT