Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: ट्रक- ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोन जागीच ठार, जेसीबीच्या सहाय्याने काढले मृतदेह

ट्रक- ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोन जागीच ठार, जेसीबीच्या सहाय्याने काढले मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : भरधाव ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत ट्रक व ट्रॅव्हल्स चालकांचा जागीच मृत्‍यू झाला. महागांव तालुक्यातील मुडाणा (Yawatmal News) येथे घटना घडली. अपघात (Accident) इतका भीषण होता की मृतदेह जेसीबीच्‍या सहाय्याने काढावे लागले. (Maharashtra News)

नागपूर– तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुडाणा येथील शिवतेज धाब्यासमोर महागावकडुन नांदेडकडे दगडी कोळसा घेवुन जाणार ट्रक आणि नांदेडकडून नागपुरकडे जाणारी विना नंबरची ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर धडक झाली. ही दोन्ही वाहने भरधाव वेगाने असल्याने व अचानक समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला आहे.

दोन्‍ही चालकांचा दाबले गेल्‍याने मृत्‍यू

दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. ट्रक चालक अरुण पुंडलिक सिरसे राहणार अमुलगा जिल्हा नांदेड तर ट्रॅव्हल्स चालक बापी मकरा कर्मकार राहणार बलाजुडी (झारखंड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहेत. दोन्ही मृतदेह अपघातग्रस्त वाहनातच अडकुन पडल्याने गावकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. तर जखमीला उपचारासाठी हलविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT