यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेच्या नगरसेविकेची गळफास घेवून आत्महत्या  Saam TV
महाराष्ट्र

यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेच्या नगरसेविकेची गळफास घेवून आत्महत्या  

आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ- सुरेखा मोहन मेंडके‌ वय ३५ यांनी राहत्या घरी दुपारच्या दरम्यान गळफास लावून आत्माहत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुरेखा मेंडके यांनी काँग्रेस कडून २०१६ मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणुक लढवली आणि त्यात विजयी झाल्या. तद्नंतर सुरूवातीला महिला व बालकल्याण उपसभापती म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. नगरसेविका सुरेखा मेंडके या आर्णी येथील नारायणलीला ले आऊट मध्ये रहात होत्या. मात्र रविवारी दुपारच्या दरम्यान रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप  कळाले नाही. पुढील तपास आर्णी पोलिस करीत आहे.

दरम्यान यवतमाळमध्ये बुधवारी दि.१० नोव्हेंबर च्या रात्री शिकाऊ डाॅक्टर अशोक पाल यांची शुल्लक कारणावरून हत्या केल्याची घटना वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडली होती. तद्नंतर शिकाऊ विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेत विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केलं होत. शनिवारी दुपारी दरम्यान घटनेतील तीन आरोपींना पोलीसांकडून अटक करण्यात आली. रात्री उशीरा डाॅ.दिलीप म्हैसेकर संचालक वैधकिय शिक्षण व संशोधन यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन समजून काढत पुर्ण मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज रविवारी दुपारी दरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; मालक रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

SCROLL FOR NEXT