yavatmal Saam
महाराष्ट्र

Yavatmal: बायको रूसून गेली मामाच्या घरी; माजी सैनिक संतापला अन् हवेत धाडधाड गोळ्या झाडल्या

Yavatmal Ex-Soldier News: माजी सैनिकाने रागाच्या भरात पत्नीच्या मामाच्या घरी जाऊन हवेत आणि जमिनीवर गोळीबार केला. या प्रकरणी माजी सैनिकाच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने घराशेजारी राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी जाऊन हवेत आणि जमिनीवर गोळीबार केला आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांचा पत्नीसोबत वाद झाला होता. वाद टोकाला गेला पत्नीनं घर सोडून मामाचं घर गाठलं. यावेळी पतीने गोळीबार करत पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात तक्रार दाखल केली.

संजय राठोड असे माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांचे आपल्या पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाले होते. वाद विकोपाला गेला होता. रागाच्या भरात राठोड यांच्या पत्नीने घर सोडून थेट मामाचं घर गाठलं. त्यानंतर संतप्त राठोड हे थेट मामाच्या घरी गेले आणि त्यांनी परवानाधारक बंदुकीतून एक गोळी हवेत आणि दुसरी जमिनीवर फायर केली.

या प्रकारामुळे घरातील सदस्य आणि आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पत्नीने तात्काळ नेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडील परवानाधारक बंदूक जप्त केली. तसेच संजय राठोड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी नेर पोलीस पुढील तपास करीत असून, माजी सैनिक असूनही अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे स्थानिकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्हा कारागृहात दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT