Yavatmal: भयंकर! जादुटोणाच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला; तरोडा गावातील धक्कादायक प्रकार Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal: भयंकर! जादुटोणाच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला; तरोडा गावातील धक्कादायक प्रकार

जादुटोणाकरत असल्याचा संशयावरून गावातील काही नागरिकांनी घर आणि मोटर सायकल जाळून पती- पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ: जादुटोणाकरत असल्याचा संशयावरून गावातील (village) काही नागरिकांनी घर आणि मोटर सायकल जाळून पती- पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उमरखेड (Umarkhed) तालुक्यातील तरोडा (Taroda) येथे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २० फेब्रुवारी रात्री दरम्यान तरोडा येथील एका पती पत्नीचे घर जाळुन त्यांना मारहाण (Beating) करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या माहितीवरुन ठाणेदार राजीव हाके, पोलीस (Police) उपनिरीक्षक राजेश पडीत, राम गडदे, यांनी तरोडा येथे घटनास्थळी जाऊन घराची पाहणी केली आहे. घटनास्थळी पाहणी केली असता ४ ते ५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. घर हे पुर्ण जळुन खाक झाले असून त्यात मोटार सायकल देखील जाळण्यात आले आहे. त्यांनतर गावातील (village) संरपचांना भेटुन जखमीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले आहे की, विनायक ग्यानबा भोरे याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे (Beating) तो गंभीर रित्या जखमी झाला आहेत.

मुळावा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जादुटोणा करत आहे, या संशयावरुन गावातील काही लोकांनी त्यांना जिवे मारण्याचे उद्देशाने घराची राखरांगोळी करुन फिर्यादीस व तिच्या पतीस लाकडी काठीने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरोडा जादूटोणा प्रकरणात ७ आरोपीना (Accused) रात्रीच्या सुमारास अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम- ३०७. ४३६ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT