Yavatmal, Crime News, Husband, Wife Saam tv
महाराष्ट्र

Crime News : लागोपाठ दोन मुली झाल्यानं पत्नीवर प्राणघातक हल्ला; पती पाेलिसांत हजर

तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारसाठी नांदेड येथे नेले.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal Crime News : लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती नेहमीच पत्नीला वाद घालत मारहाण करायचा. दरम्यान अश्याच वादातून पतीने पत्नीशी वाद घालत सुरुवातीला नायलॅान दोरीने गळा आवळुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यास पत्नीने स्वत:च्या बचावासाठी विरोध केला असता पतीने (husband) पत्नीवर (wife) वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पार्डी बंगला येथे घडली. या घटनेनंतर पती स्वत: पोफाळी पोलीस ठाण्यात गेला आणि केलेल्या कृत्यची माहिती पाेलिसांना दिली.

जयश्री शिवाजी चव्हाण असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेतील शिवाजी अवधुत चव्हाण (वय ३८, पार्डी बंगला) असं पाेलिसांत हजर झालेल्या जयश्री यांच्या पतीचं नाव आहे. शिवाजी चव्हाण याने कोयत्याने वार करून पत्नीस गंभीर जखमी केल्याची माहिती दिल्यानंतर ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर जयश्री यांना तिच्या नातेवाईकांनी उपचारसाठी नांदेड येथे नेले. घटनास्थळावर रक्ताचा सडा होऊन बाजूलाच रक्ताने माखलेला लोखंडी कोयता व नायलॅान दोरी पडुन होते. ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान जयश्री यांनी दिलेल्या जबाबावरुन पोफाळी पोलीस ठाण्यानं शिवाजी चव्हाण यांच्या विरुद्ध कलम ३०७ प्रमाणे गुन्हा नोंदविला. शिवाजी चव्हाण यास अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. अधिक तपास ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले, राम गडदे हे करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT