Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : बनावट सोन्याची नाणी पडली दहा लाखांत; रोकड असलेली बॅग हिसकावून तोतया पोलीस पसार

Yavatmal News : तोतया पोलीस बनून व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. यात सदर इसम हा पोलीस बनून लातूर जिल्ह्यातील व्यावसायिक तरुणाला भेटला

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : वडीलाची अचानक प्रकृती बिघडली आहे. पैशाची तातडीने गरज असून खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी अगदी कमी दरात विकायची आहे; असे सांगून एका व्यवसायिकाची दहा लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

तोतया पोलीस बनून व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. यात सदर इसम हा पोलीस बनून लातूर (Latur) जिल्ह्यातील व्यावसायिक तरुणाला भेटला. त्याने वडील आजारी असल्याचे सांगत सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात रोख रक्कमेची मागणी केली. त्यानुसार सदर तरुणाला यवतमाळच्या (Yavatmal) आर्णी शहराबाहेर दिग्रस बायपासवर बोलविले. त्यानुसार दहा लाख रोख घेऊन तिथे पोहोचला. देवाणघेवाण सुरू असताना तोतया पोलिसांनी दहा लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेले.  

आठ जणांवर गुन्हा दाखल 

घडल्या प्रकरणानंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून महेश रामेश्वर हाके (रा. शिरणाळ, जिल्हा लातूर) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहेत. दरम्यान घटनेत वापरण्यात आलेल्या वाहन मालकाला पोलीसांनी अटक केली असून बाळू जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT