Yavatmal News Saam Digital
महाराष्ट्र

Yavatmal News : पैनगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू; तहसीलदारांवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी नदीपात्रात सुरू केलं आंदोलन

Yavatmal Panganga News : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे पैनगंगा नदीपात्रात तिघांचा बूडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

Sandeep Gawade

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे पैनगंगा नदीपात्रात तिघांचा बूडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. प्रतिक्षा चौधरी,अक्षरा चौधरी आणि आराध्य चौधरी अशी मृतांची नावं आहेत. पूजेचं निर्माल्य विसर्जन करताना ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान पैनगंगा नदीत बेसुमार वाळू उपसा सुरू असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत तहसीलदार आणि तलाठी यांच्यावर कारवाई होत नाहीय तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि मुली पूजा आटोपल्यानंतर निर्माल्य विसर्जन करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात उतरल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या आणि यातचं त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पैनगंगा नदीपात्रा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून नऊ कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त केला होता.

विरारमधील घटनेची केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

मुंबईतील विरारमध्ये सांडपाणी प्रकल्पाची साफसफाई करताना चार सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याची दखल केंद्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. साफसफाईचं कास सुरू असताना झालेल्या निष्काळजीपणाबाबत आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात चुकूनही या भांज्याचे सेवन करू नका, होऊ शकतो त्रास

Sai Tamhankar : हाय मेरी परम सुंदरी, सई ताम्हणकरचा लेटेस्ट लूक

Pandharpur Rain : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी-वीर धरणातून मोठा विसर्ग | VIDEO

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Navratri 2025: नवरात्रीत करा नारळाचा सोपा उपाय, होईल फायदा

SCROLL FOR NEXT