Saam tv Yavatmal News
महाराष्ट्र

Yavatmal : पैशांचं झाड! शेतकरी एका रात्रीत झाला करोडपती, नेमकं प्रकरण काय?

Yavatmal News : शेतात एक जुने झाड आहे. मात्र २०१३- १४ पर्यंत हे झाड नेमके कशाचे आहे? हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. मात्र २०१३-१४ मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला यात झाड कसले आहे याची माहिती झाली

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला झाडाने करोडपती केल्याचे समोर आले आहे. वडिलोपार्जित असलेल्या शेतामध्ये असलेल्या शंभर वर्ष जुन्या झाडामुळे हे सर्व घडून आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून मार्ग पाहणीसाठी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये या झाडाचे मूल्य समजले आणि कोर्टाच्या निर्णयानंतर शेतकरी कुटुंबाला एक कोटी रुपये मिळणार आहेत. यातील निम्मे रक्कम शेतकरी परिवाराला मिळाली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे या शेतकऱ्याकडे ७ एकर वडिलोपार्जित शेती आहे. शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा- यवतमाळ, पुसद- नांदेड रेल्वे मार्ग जातो. या शेतात एक जुने झाड आहे. मात्र हे झाड नेमके कशाचे आहे? हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. मात्र २०१३-१४ मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य शेतकऱ्याला समजावून सांगितले.

रक्तचंदन झाडाचे पाच कोटी इतके मूल्य 

दरम्यान रेल्वे मार्ग उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने भूसंपादन केले. मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे या परिवाराने झाडाचे खाजगी मधून मूल्यांकन काढले असता त्याचे मूल्य चार कोटी ९७ लाख रुपये इतके होते. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केल्याने शिंदे परिवाराने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने एका वर्षात निकाल दिला आहे. 

न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात रेल्वे विभागाकडून एक कोटी रुपये देण्याचे आदेश देत रेल्वे विभागाकडून एक कोटी रुपये जमा करून घेतले. मात्र याचिकाकर्त्यांचे वकील राऊत यांनी मूल्यांकननंतर रक्त चंदनाच्या झाडाच्या मोबदल्याची किंमत पाच कोटी रुपये पर्यंत होऊ शकते असा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT