Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: आमदार नाईकांच्या पत्‍नी उतरल्या पुरग्रस्तांच्या मदतीला; २५०० लोकांची केली जेवणाची व्यवस्था

आमदार नाईकांच्या पत्‍नी उतरल्या पुरग्रस्तांच्या मदतीला; २५०० लोकांची केली जेवणाची व्यवस्था

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. यातच पुसद लगत असलेल्या पूस नदीला आलेल्या पुरामुळे पुसद ते (Hingoli) हिंगोली, वाशीम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यात प्रवाशांचे हाल होऊ नये; म्हणून म्हणून पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडून हजारो लोकांना भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून (Yavatmal News) देण्यात आली. विशेष म्हणजे ही व्यवस्था संभाळण्यासाठी आमदार इंद्रनील यांच्या पत्नी मोहिनी नाईक पुढे आल्या. (Yavatmal News Indranil Naik)

राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईकांचा सामाजिक वसा पुढे नेताना मोहिनी नाईक यांच्याबद्दल जनमानसात मोठी सहानुभूतीची चर्चा होत आहे. पुसदच्या बंगल्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले. वसंतराव नाईक यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणुन काम केले. त्याचे पुतणे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ही मुख्यमंत्री राज्याचा धुरा संभाळली. माजी मंत्री मनोहरराव नाईक नंतर नाईक घराण्याचा वारसा म्हणुन आमदार इंद्रनिल नाईक पुढे आले.

अडीच हजाराहून अधिक प्रवासी अडकले

पुस नदीला पुर आल्याने पुसद शहरात पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुरात अडीच हजार पेक्षा जास्त प्रवाशी अडकले आहेत. आमदार इंद्रनिल नाईक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी पुरात अडकलेल्या प्रवाश्यांची भोजनाची व्यवस्था केल्याने जिल्ह्यात नाईक घराण्याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रामकुंडावर ठाकरे सेनेचं आंदोलन

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

SCROLL FOR NEXT