Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal: तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती– पत्‍नीचा मृत्‍यू

तलावाच्‍या पाण्यात पाय घसरून पती– पत्‍नीचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू (Death) झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले. (Yavatmal News Husband Wife Death)

वरुड जहागीर येथील (Farmer) शेतकरी सुभाष राऊत व त्यांच्‍या पत्नी सुरेखा राऊत हे दररोज जागली करण्याकरिता शेतात जात होते. त्यांचे शेत हे गावातील तलावाच्या पलीकडे असल्याने त्यांना तलाव पार करून जावे लागत होते. रात्री शेतातून जागली करून आज सकाळी साडेआठच्‍या सुमारास गावाकडे परत येत होते. यावेळी सुरू असलेल्या (Heavy Rain) मुसळधार पावसामुळे तलावाला भरपूर प्रमाणात पाणी होते.

एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्‍नात बुडाले

दोघेही पती– पत्नी तलावाच्या खालच्या ओव्हरफ्लोमधून येत असताना रस्ता पार करतांना पुराच्या पाण्यात पाय घसरला. यात दोघेही एकमेकाला वाचविण्याच्या नादात पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात दोघे पती पत्नीचा मृत्यू झाला. घटनास्थळी राळेगाव पोलीस दाखल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT