Yavatmal Accident Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident : ट्रॅव्हल्स ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Yavatmal News : नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील जवळाजवळील शेलु फाट्याजवळ हा अपघात झाला आहे

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सने ट्रेकला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील जवळाजवळील शेलु फाट्याजवळ हा अपघात (Accident) झाला आहे. महामार्गावर नांदेडवरून बिलासपूर ते छत्तीसगडला उडीद घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समोरचा टायर पंक्चर झाला होता. यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली होती. (Yavatmal) याच मार्गावरून नांदेड कडून यवतमाळमार्गे नागपूरला प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने उभ्या ट्रकला मागून धडक दिली. 

अंदाज न आल्याने धडक 

रस्त्यावर उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्सची मागून धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर ट्रॅव्हल्समधील दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली .कृष्णा उर्फ भगवान भुजंगा वाघमारे (वय २८, रा. पलसी लोहा जी. नांदेड) असे अपघातात मृत एकाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतकाची अजून ओळख पटली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

Student Letter : "ताईंची बदली करू नका", शिक्षिकेसाठी तिसरीच्या विद्यार्थ्याचं शरद पवार यांना भावनिक पत्र

Mumbai: बोरीवलीच्या भाजी मंडईत तुफान राडा, कॅरेटने एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार

Stress Relief At Work: ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा 'ही' योगासने

SCROLL FOR NEXT