Yavatmal Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीची वाटणी करण्यावरून वाद; भावानेच भावाला संपवलं

Yavatmal Crime News : या थरारक घटनेत राहूल याचा जागीच मृत्यू झाला

Satish Daud

संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यातील माळीपुरा नगरात एक भयंकर घटना घडली आहे. शेतीच्या वादातून दोन सख्या भावांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की, लहान भावाने मोठ्या भावाच्या पोटावर चाकुने सपासप वार केले. या थरारक घटनेत मोठ्या भावाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Yavatmal Malipura Crime News Murder Of Older Brother by Younger)

राहूल बाचलकर असं मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या भावाचं नाव असून सतीश बाचलकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल आणि सतीश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. काही कारणास्तव त्यांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून शेतीची वाटणी करण्यावरून त्यांचा वाद सुरू होता. मंगळवारी दोन्ही भावांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली.

दरम्यान, दोघांमध्ये सुरू असलेला वाद इतका विकोपाला गेला की, लहान भाऊ सतीश याने रागाच्या भरात मोठा भाऊ राहूल याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. या थरारक घटनेत राहूल याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत जेरबंद केले. शेतीची वाटणी करण्यावरून लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याने माळीपुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT