Yavatmal Crime News  SaamTvNews
महाराष्ट्र

अनैतिक संबंधातून गळा चिरून महिलेच्या हत्येचा प्रयत्न; प्रियकरास अटक

विवाहित प्रेयसीचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून आरोपी शाहरुख खानने प्रेयसीचा गळा चिरून ठार करण्याचा प्रयत्न केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ शहरातील धामणगाव बायपास मार्गावर एका महिलेला मारहाण करून तिचा गळा चिरून जीवाशी ठार (Killing) मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दरम्यान उघडकीस आली. अनैतिक संबंध मधून हा हल्ला झाल्याची माहिती असून पोलिसांनी मारेकरी प्रियकरास अटक केली आहे. यवतमाळ (Yavatmal) शहरातील धामणगांव बायपास धारीवाल रेसिडेन्सी च्या मागील बाजूच्या वीटभट्टी जवळ एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. (Yavatmal Latest Crime News)

हे देखील पहा :

त्यावरून शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक ३५ वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे दिसले. त्यावेळी तिचा गळा धारधार शस्त्राने चिरला असल्याचे लक्षात आले. अर्चना क्षीरसागर राहणार गोदाम फैल यवतमाळ असे जखमी महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी (Treatment) दाखल केले. दरम्यान अर्चनावर हा हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला अशा प्रश्न उपस्थित केल्या जात होता.

दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अर्चना क्षीरसागर हिचा प्रियकर शाहरुख बहादूर खान रा. नेताजी नगर याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता शाहरुखचे गेल्या वर्षभरापासून प्रेमप्रकरण (Relationship) सुरू होते. अर्चना ही विवाहित असून ती आपल्या पती पासून विभक्त झाली आहे. तिचे शाहरुख सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. त्यातूनच शाहरुखने अर्चनाचा गळा चिरून खून (Murder) करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आणि अर्चना यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ती भेटण्यास ही नकार देत होती. तिने तिचे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरु असल्याची कबुली देखील शाहरुखला दिली.

याचाच राग मनात ठेवून शाहरुखने अर्चनाला यवतमाळच्या स्टेट बँक चौकात बोलवलं आणि गाडी वर बसून वीटभट्टी परिसरात नेले तिथं दोघे बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी शाहरुख ने रागाच्या भरात आपल्या खिशात आणलेल्या कटरने सरळ अर्चनाचा गळा चिरला आणि तिथून पलायन केले. आज यवतमाळ शहर पोलिसांच्या (Police) गुन्हे शोध पथकाने शाहरुखला अटक केली. अनैतिक संबंध ला नकार अर्चना देत होती. त्यामुळे त्याने हा हल्ला केल्याची कबुली शाहरुखने पोलिसांना दिली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जखमी महिला ही रुग्णालयात उपचार घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT