Yavatmal DCC Bank, Yavatmal News  saam tv
महाराष्ट्र

Yavatmal DCC Bank Chairman Election : यवतमाळ जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकासचा? 5 जणांच्या नावांची रंगलीय चर्चा

राजकीय समीकरण बदलल्याने निवडीबाबत उत्सकुता ताणली गेली आहे.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवडीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या 18 सप्टेंबरला या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कांगोरे यांनी राजीनामा दिला. कांगाेरे यांच्या राजीनाम्यानंतर बॅंकेच्या राजकारणाची समीकरणे पूर्णत: बदलली आहेत. या बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी पाच जणांची नावांची चर्चा सुरु झाली आहे.

नव्या अध्यक्षांसाठी सध्या महायुतीकडून चार जणांची नावे पुढे आली आहेत. महाविकास आघाडीकडून एक नाव चर्चेत आहेत. यामध्ये महायुतीकडून वसंत घुईखेडकर, अमन गावंडे, स्नेहल भाकरे, मनीष पाटील यांची नावे चर्चेत आहे.

यवतमाळकरांत उत्सुकता

महाविकास आघाडीतून देखील राजुदास जाधव यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. त्यामुळे नेमकं अध्यक्षपदाची माळ काेणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता यवतमाळकरांना लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

वर्षभरापासून फरार असलेले घायवळ टोळीचे २ शार्पशूटर जेरबंद; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

Crime News: म्हाडा कॉलनीत दोन गटात हाणामारी; मारामारीदरम्यान एकानं जमावावर ताणली बंदूक अन्...

Maharashtra News Live Update: पुण्यासह देशभरात आज नीट परीक्षा संपन्न, परीक्षा केंद्रावर गोंधळ नाही

किसान क्रेडिट कार्डच्या नियमात बदल; RBI ची घोषणा

SCROLL FOR NEXT