Yavatmal Crime News Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal Crime News: अज्ञातांनी 73 प्रवाशांना उतरवलं अन् बसला आग लावली ; उमरखेडमधील धक्कादायक घटना

Crime News: अज्ञातांनी धावत्या बसला लावली आग; उमरखेडमधील धक्कादायक घटना

Ruchika Jadhav

Yavatmal News:

यवतमाळमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बसला आग लागली आहे. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या आगीत बस जळून पूर्णत: खाक झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

रात्री ९ च्या सुमारास बस नांदेडहून निघाली होती. काही अंतरावर गेल्यानंतर दोन दुचाक्यांवरून चार अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी बससमोरच आपली दुचाकी थांबवली. त्यानंतर ५ ते ६ जण रस्त्यावरून धावत आले. त्यांनी बसच्या काचा फोडल्या. तसेच बसवर पेट्रोल टाकून आग लावली.

बसमध्ये होते ७६ प्रवासी

हदगाव-उमरखेडदरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा नदी पुलाजवळ ही घटना घडली आहे. बस चालक बी. डी. नाईकवाडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बस थांबवल्यावर मागून आलेल्या ५ ते ६ जणांनी आरडा-ओरडा आणि आरेरावी करत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

प्रवाशी खाली उतरल्यावर अज्ञातांनी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांना काय सुरू आहे काय नाही काहीच समजत नव्हते. अशा प्रसंगी काय कारावे हे देखील कळेना. पोलिसांना फोन करणार तोच या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून आग लावली. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाची वाहने घटनास्थाळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. यामध्ये बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान झालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाघोली–लोणीकंद परिसरात डंपरचे ओव्हरलोडिंग,दगड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करावी?

Train Accident: मोठा रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

Shocking : माणुसकीचा अंत! २० चिमुकल्यांना डांबले अन् मिटिंगसाठी गेल्या, अंगणवाडी सेविकेचा भावनाशून्य कारभार | VIDEO

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेना फुटीवेळी 'त्या' आमदाराने शिंदेंकडून ५० कोटी घेतले, भाजप आमदाराचा दावा

SCROLL FOR NEXT