Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Yavatmal News : स्टेट बँकच्या घाटजी शाखेतून दोन लाख रुपये धनादेशद्वारे काढले. रक्कम एका पिशवीत ठेवून दोघी ग्राहक सेवा केंद्रावर गेल्या. दरम्यान संधी साधत रक्कम लांबविली

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: महिला बचत गट सचिवाने बँकेत धनादेश वटविल्यानंतर एक लाख रुपयांची रक्कम घेऊन बाहेर पडल्या. मात्र चोरटयांनी संधी साधत पिशवीत ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम लांबविली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करत रक्कम लांबविणार्या चार चोरट्यांना पोलिसांनी एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे. 

यवतमाळच्या पांढुर्णा बुद्रुक येथील वैष्णवी महिला बचत गटाच्या सचिव साधना ठावरी आणि अध्यक्ष सुनिता परसनकार या बचत गटाच्या कामासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या घाटजी शाखेतून दोन लाख रुपये धनादेशद्वारे काढले. रक्कम एका पिशवीत ठेवून या दोघी ग्राहक सेवा केंद्रावर गेल्या. दरम्यान यावर चोरट्याची नजर होती. यानंतर त्यांनी संधी साधत रक्कम लांबविली. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

ग्राहक सेवा केंद्रात असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी पिशवीत ठेवलेली एक लाख रुपये लंपास केले. काही वेळानंतर साधना ठावरी यांच्या रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच पोलिसात जात घडल्या प्रकारची तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळतात ठाणेदार केशव ठाकरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले यात आरोपींची हालचाल स्पष्टपणे दिसून आली

लॉजवरून चौघांना घेतले ताब्यात 

सीसीटीव्हीत पहिले असता चोरटे पायीच बसस्थानकावर गेले. तिथून पारवा आणि नंतर पांढरकवण्यात लाॅजवर थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी लॉजवर जात या प्रकरणात विकी काळे, आश्विन काळे, भगीरथ काळे (सर्व राहणार कोळंबी, ता. कर्जत जिल्हा अहमदनगर) आणि मारुती धोत्रे तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांना अटक करण्यात आली. या परकरणी चोकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT