भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; काका-पुतणे ठार! SaamTVNews
महाराष्ट्र

भरधाव ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; काका-पुतणे ठार!

उड्डाण पुलावर चालकाचे भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन दोघे जण जागीच ठार झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी (Arni) तालुक्यातील जवळा येथील शेतकरी स्वतःच्या दोन वर्षाच्या पुतण्याला रोटावेटर जोडलेल्या ट्रॅक्टरवर बसवून शेतात घेऊन जात असताना जवळा येथील उड्डाण पुलावर चालकाचे भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर (Tractor) पलटी होऊन दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे.

हे देखील पहा :

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जवळा (Javla) उड्डाण पुलाजवळ (Bridge) शेतात रोटावेटर नेत असताना ट्रॅक्टरचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकाचे ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटले आणि त्यामुळे हा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात (Accident) राहुल अरुण जवके (वय २५ वर्ष) व पुतण्या देऊ उर्फ गोलू जवके (वय २ वर्ष) असे जागीच ठार झालेल्या काका पुतण्याचे नाव आहे. एकाच कुटूंबातील दोन व्यक्ती अपघातात ठार (Death) झाल्याने गावामध्ये शोककळा पसरली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT