Yavatmal Accidet Saam tv
महाराष्ट्र

Accident: भरधाव वाहनानं वृद्ध दाम्पत्याला चिरडलं! दोघेही जागीच ठार

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने उडवले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी विमानतळाजवळ एका भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन तसेच टायरची जाळपोळ करत रस्ता रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. यावेळी गावकऱ्यांनी वाहनांवर दगडफेकही केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. त्यानंतर गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. भितु येलणकर आणि सती येलणकर अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.

हे देखील पाहा-

रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास वृद्ध दाम्पत्या भारी गावातून जवाहर नगर येथे जात होते. यादरम्यान यवतमाळ-नागपूर मार्ग ओलांडताना भरधाव वाहनाने त्या दोघांना जबर धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, तहसीलदार कुणाल झालटे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

SCROLL FOR NEXT