Ayodhya Poul Facebook
महाराष्ट्र

Ayodhya Poul : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना घरात घुसून मारहाण; लाइव्ह व्हिडिओ केला शेअर

Ayodhya Poul: : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केल्याचा आरोप पौळ यांनी केलाय.

Bharat Jadhav

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या अयोध्या पौळ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात घुसून ही मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करून मारहाण झाल्याचे सांगितले आहे. यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

काही महिला घरात घुसल्या. त्यांनी मला मारहाण केली,असा आरोप अयोध्या पौळ पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह केला. संबंधित महिला कार्यकर्त्या यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्या असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी एक्सवरही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. लोकांना पराभव समोर दिसत असल्यानं हा हल्ला केला, असंही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

काही महिला घरात घुसल्या आणि त्यांनी मला मारहाण केली. माझा मोबाईल हिसकावून गेल्या आहेत. तसेच त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अयोध्या पौळ-पाटील यांनी केला. मला मारहाण झाली. मला काही झालं तर त्याला यामिनी जाधव जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पौळ पाटील यांना फोन करून विचारपूस केली आहे. यासंदर्भात पोलिसांत रितसर तक्रार करण्यासही ठाकरे यांनी फोनवरून सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak Recipe: पारंपारिक पद्धतीनं घरीच बनवा उकडीचे मोदक, सर्वांना आवडतील

मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध; भुजबळांच्या नाशिक निवासस्थानी सुरक्षेत वाढ|VIDEO

Budget Formula : व्याजाचा बोजा नाही, ईएमायचं टेन्शन नाही; बजेटमधील गाडी घेण्यासाठी 'हा' फॉर्म्युला वापरा

Maharashtra Live News Update : कंत्राटी आरोग्य कर्मचारी पंधरा दिवसापासून बेमुदत संपावर

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकमध्ये नोंद, जाणून घ्या वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT