maharashtra kesari saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Kesari 2025: पृथ्वीराज मोहोळ ठरला ' महाराष्ट्र केसरी', पण फायनलमध्ये महेंद्र गायकवाडने मैदान का सोडलं?

Prithviraj Mohol vs Mahendra Gaikwad, Maharashtra Kesari Final: महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड हे दोघेही आमनेसामने आले होते.

Ankush Dhavre

Maharashtra Kesari Update: महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासातील मानाची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार अहिल्यानगरमध्ये रंगला. वाडिया पार्कच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत या स्पर्धेचा थरार रंगला.

मात्र ही स्पर्धा कुस्तीमुळे नव्हे, तर कुस्ती दरम्यान झालेल्या राड्यामुळे चर्चेत राहिली. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याच्या आरोपावरून शिवराज राक्षेने पंचांना कॉलर ओढून लाथ मारली. त्यानंतर अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडने देखील मैदान सोडलं.

पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड हे दोघेही आमने सामने आले होते. या सामन्यापूर्वी तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान अंतिम सामन्यातही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचं सांगत महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी गदेचा मानकरी ठरला.

नेमकं काय घडलं?

गादी विभागातील सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते. अवघ्या १ मिनिटात या सामन्याचा निकाल लागला. कुस्ती सुरू होताच पृथ्वीराजने डाव टाकला आणि शिवराजला खाली पाडत चितपट केलं. पंचांनी निर्णय देत, पृथ्वीराजला विजयी घोषित केलं.

पण शिवराज या निर्णयावरून नाराज असल्याचं दिसून आलं. त्याने पंचांकडे रिप्ले पाहण्याची मागणी केली. मात्र पंचांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यामुळे शिवराजला संताप अनावर झाला. त्याने रागात पंचांची कॉलर ओढली आणि रागात लाथही मारली.

असाच काहीसा ड्रामा फायनलमध्येही पाहायला मिळाला. अवघ्या काही मिनिटांत महेंद्र गायकवाडने माघार घेत मैदान सोडलं. त्याने पंचांवर चुकीचा निर्णय देत असल्याचे आरोप केले. महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्यामुळे पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला.

दरम्यान स्पर्धेत राडा घालणाऱ्या शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेने दोन्ही कुस्तीपटूंवर ३ वर्षांची बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT