चिंताजनक : गोंदियात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एकाच दिवशी आढळले नवे 7 कोरोना रुग्ण! Saam Tv
महाराष्ट्र

चिंताजनक : गोंदियात पुन्हा कोरोनाचा शिरकाव; एकाच दिवशी आढळले नवे 7 कोरोना रुग्ण!

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून एकाच दिवशी 7 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होऊ लागलीय.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून आज घेण्यात आलेल्या तपासणीत तब्बल 7 नवे कोरोना रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आज सापडलेले सर्व 7 कोरोना रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहेत.

हे देखील पहा :

गोंदिया जिल्हा नुकताच कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असू एकाच दिवशी तिरोडा तालुक्यात 7 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले असून जिल्हा पुन्हा कोरोना सावटाखाली आला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केला होता. दरम्यान, 27 मार्च 2020 रोजी जिल्ह्यात पहिला बाधित आढळला होता.

त्यानंतर अवघ्या जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला व बघता-बघता जिल्ह्यातील बाधितांची संख्या आतापर्यंत 41 हजार 233 एवढी झाली आहे. दुसऱ्या लाटेने केलेल्या कहरानंतर परिस्थिती नियंत्रणात आली व त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या घटत 23 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आता वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT