Wardha News Saam Tv
महाराष्ट्र

हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहाच्या मेसच्या भोजनात अळ्या; 13 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ

विद्यार्थ्यांनी रात्री वासतिगृहातच आंदोलन करीत कारवाईची मागणी केलीय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

Wardha News : वर्ध्याच्या (Wardha) महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. रात्रीत जेवणात अळ्या निघाल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्री वासतिगृहातच आंदोलन करीत कारवाईची मागणी केलीय. रात्री तेरा विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या झाल्याची माहिती आहे. (Wardha Latest News)

दीड ते दोन महिन्यांपासून हा प्रकार सतत होत असल्याने विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी चांगलेच संतापलेय. रात्रीच्या जेवणात देखील अळ्या निघाल्या. तब्बल तेरा विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. प्रकृती अस्वस्थ झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाताच आंदोलन सुरू केले.

रात्री 9 वाजतापासून सुरू झालेले आंदोलन रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते. प्रकृती अस्वस्थ झालेल्यामध्ये पाच मुली आणि आठ मुलांचा समावेश आहेय. भारत माता की जय च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मेसच्या जेवणाचे पैसे घेऊन देखील योग्य भोजन मिळत नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. अखेर विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि तोडगा काढला असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT