Worli hit and run case  Saam Tv
महाराष्ट्र

Worli Hit And Run Case: मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांना अटक

Worli Hit And Run Case: वरळीमधील हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत शिंदे गट शिवसेनेचे नेत्याला अटक करण्यात आलीय. अपघातात शिवेसेना नेत्याच्या मुलाचा समावेश असून तो अजून फरार आहे. अपघात झाला त्यावेळी नेत्याचा मुलागा कार चालवत होता.

Bharat Jadhav

वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. या अपघात प्रकरणी वरळी पोलिसांनी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत यांना अटक करण्यात आलीय. राजेश शहा आरोपी मिहीर शहा यांचे वडील आहेत. दरम्यान मिहीर हा अपघातप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे. या प्रकरणात कार चालक राजेंद्रसिंह बिडावतसह राजेश शहा यांना अटक करण्यात आलीय. राजेंद्रसिंह हा अपघातावेळी कारमध्ये होता.

दरम्यान वरळी पोलिसांनी या दोघांची दिवसभर चौकशी केली, त्यानंतर यांना अटक करण्यात आलीय. आरोपी मिहीर शहाला पळून जाण्यासाठी या दोघांनी मदत केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. तसेच या अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

वरळी पोलिसांनी ही कारवाई करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितलं की, या प्रकरणातील दोषींवर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल. कोणालाच वाचवलं जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT