workers strike interrupts nashik city link bus service today saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलं काम बंद आंदाेलन, सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल

दाेन वर्षांपासून पगार वाढ झालेली नाही असेही कर्मचा-यांनी नमूद केले.

अभिजीत सोनावणे

Nashik City Link Bus Service News :

नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा आज (बुधवार) पुन्हा ठप्प झाली. सुमारे 450 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी पगार थकल्याने अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने बस सेवा ठप्प झाल्याचे समजते. दरम्यान या काम बंद आंदाेलनामुळे एकही बस स्थानकातून बाहेर पडू शकली नाही. परिणामी प्रवाशांचे मात्र हाल झाले. (Maharashtra News)

नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचा-यांकडून मिळालेल्या माहितीनूसार सुमारे १ महिन्याच वेतन थकल्याच्या विरोधात हे आंदाेलन छेडण्यात आले आहे. कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस देखील दिला गेलेला नाही.

ईएसआय व पीफ सात आठ महिन्यांपासून भरला गेलेला नाही. तो लगेच भरावा अशा मागणी कर्मचा-यांनी केली आहे. या व्यतरिक्त ईएसआयचे पैसे भरले नसल्याने उपचार मिळत नसल्याची खंत कर्मचा-यांनी व्यक्त केली.

आम्ही वेळाेवेळी मागणी करीत आहाेत. ती अद्याप पूर्ण न झाल्याने आता सहावे आंदोलन छेडल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. दरम्यान विनातिकीट प्रवाशी आढळल्यास ३६४ रुपये दंड केला जातो मात्र तो दंड वाहकाला तीन ते पाच हजार केला जातो. तो बंद करावा अशी मागणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजच्या आंदाेलनामुळे पहाटे चार पासून तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. दरम्यान बस बंद झाल्याने प्रवाशांचे माेठे हाल झालेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळे १९,१०० रुपयांनी महागले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

Crime News : कोल्हापूर हादरले! दागिन्यांसाठी नातवाने आजीला संपवलं, चहातून विष दिलं नंतर...

Banana Leaf Pakora: चवदार, कुरकुरीत केळीच्या पानांची भजी कशी बनवायची?

Rahul Chahar Divorce: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा घटस्फोट, तीन वर्षांपूर्वीच गर्लफ्रेंडसोबत केलं होतं लग्न

SCROLL FOR NEXT