solapur, solapur muncipal council, workers strike saam tvn
महाराष्ट्र

Solapur : आयुक्तांच्या विराेधात शेकडाे साेलापूर महापालिका कर्मचारी उतरले रस्त्यावर; संपही पुकारला

त्यामुळं शासनानं त्यांची बदली करावी अशी मागणी कामगारांची आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur : कामगार एकजूटीचा विजय असाे... हम सब एक है... हमसे जाे टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा अशा घाेषणा देत आज सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने पालिका आयुक्त हटाव या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा (morcha) काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा येताच माेर्चेक-यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली.

सोलापूर महानगरपालिकेतील आयुक्त पी शिवशंकर यांच्या मनमानी कारभार, बेकायदेशीरपणे गुगल कॅलेंडर, जि ओ टेक , वाय टेक प्रणाली कर्मचाऱ्यांना लागू करून कर्मचाऱ्यांना छळवाद सुरू ठेवल्याने अधिकारी पासून चतुर्थश्रेणीतील सर्व कामगार त्रस्त झाले आहेत.

कामगार नेते अशोक जानराव म्हणाले सोलापूर महापालिकेतील आयुक्त पी शिवशंकर यांच्या कामकाजामुळं नागरिकांना आणि कामगारांना मनस्ताप हाेत आहे. त्यांना परिपत्रकाचा अर्थ लावता येत नाही असं आश्चर्य जानराव यांनी व्यक्त केले. त्यामुळं शासनानं त्यांची बदली करावी अशी मागणी कामगारांची आहे. त्यामुळेच आम्ही आज संप पुकारला आहे असेही जानराव यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT