Chandrapur Accident संजय तुमराम
महाराष्ट्र

कर्तव्य बजावून घरी परतताना महिला पोलिसावर काळाचा घाला; अपघातात जागीच मृत्यू

बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी ड्युटी संपल्याने कामावरुन घरी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : एका आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला पोलिस कर्मचारी (Female Police Officer) जागीच ठार झाल्या आहेत. बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी ड्युटी संपल्याने कामावरुन घरी जात असताना त्यांना मागून आयशर ट्रकने धडक दिल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मोनल बनकर असं अपघातात मृत्यू झालेल्या महिला पोलिस (Police) कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोनल या आपले दैनंदीन कर्तव्य बजावून त्यांच्या राजुरा येथील राहत्या घरी निघाल्या होत्या. मोनल या राजुरा तहसील कार्यालय (Rajura Tehsil Office) मार्गावरील वर्दळीच्या भागातून जात असताना त्यांना आयशर ट्रकने मागून दिल्य़ाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एका कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळेच या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT