Jaripatka Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: कडाक्याच्या थंडीत महिलेने अंथरुणाजवळ पेटवली शेकाेटी अन्... पुढे जे घडलं ते धक्कादायक

सध्या राज्यात अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - सध्या राज्यात अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक शेकोटीचा आधार घेतात. थंडीमुळे ठीक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मात्र, याच शेकोटीने एकाचा जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना नागपुरमध्ये (Nagpur) घडली आहे.

नागपुरतं कडाक्याची थंडी असल्याने एका महिलेनं आपल्या अंथरुणाजवळ शेकोटी पेटविली होती. मात्र, अंथरुणातून उठताना चक्कर आल्याने ही महिला शेकोटीवर पडली. यावेळी शेकोटीतील जाळामुळे या महिलेच्या कपड्यांनी पेट घेतला. या घटनेत त्यांचा चेहरा आणि छाती जळाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.(Nagpur News)

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद निमा यादव असं या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर हिवाळ्यात शेकोटी पेटवून त्याजवळ बसणाऱ्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT