Women in Dhule’s Nimgul village unite and pass a resolution banning fake godmen amid rising awareness after the Kharat case. saam tv
महाराष्ट्र

महिलांकडून भोंदूबाबांना गावबंदी, खरात प्रकरणानंतर महिलांची मोहीम

Impact Of Ashoka Kharat Case On Rural Maharashtra: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता खेडोपाडी महिला जागृत झाल्या आहेत. एका गावात तर भोंदूंना गावबंदीचा ठराव करत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात भोंदूगिरी विरोधात महिला एकवटल्या आहेत ? पाहूया एक खास रिपोर्ट.....

Girish Nikam

नाशिक जिल्ह्यात भोंदूबाबा अशोक खरातनं महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्याचे नवनवीन काळे कारनामे समोर येत असल्याने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे संतप्त पडसाद खेडोपाडीही उपटतायेत. धुळे जिल्ह्यात निमगुळ गावच्या महिलांनी तर भोंदू बाबांना गावबंदी केली आहे. कुठल्याही प्रकारच्या भोंदूला गावामध्ये थारा मिळणार नसल्याचा मोठा निर्णय महिलांनी घेतलाय.

राज्यात भोंदू बाबांकडून महिलांना संमोहीत करून लुटलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर आता जनजागृती होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पुढाकार घेऊन लोकांचं प्रबोधन सुरु केलं आहे. बुवाबाजीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरोधात नागरिक सतर्क झालेत. पुणे जिल्यातील खेड तालुक्यात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूला गावक-यांनी चोप देऊन पळवून लावलं. दुसरीकडे रायगडच्या खालापूरमध्येही 'अब्दुल रशीद उर्फ बाबाजान' या भोंदूबाबाने महिलेचे शोषण केल्याची तक्रार दाखल झाल्याने त्याला अटक झाली आहे. त्यामुळे गावागावात महिलांची अशी एकी आणि जनजागृती झाली तर भोंदूगिरीला नक्कीच चाप बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन; केडीएमसी रुग्णालयावर गंभीर आरोप

Janhvi Kapoor: मैत्रिणीच्या लग्नात जान्हवी कपूरचा रॉयल अंदाज; १.५ लाखांच्या काळ्या लेहंग्यात दिसली महाराणीसारखी

Railway Crime: धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

काळजाचा थरकाप! प्रशासनाची बंदी झुगारून धबधब्यावर 17 जणांची हुल्लडबाजी; पुण्याचे दोन पर्यटक बुडाले

Thane Tourism : ठाण्याच्या जंगलात लपलाय सुंदर धबधबा, सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT