Kolhapur Crime संभाजी थोरात
महाराष्ट्र

धक्कदायक! आंबा-मानोली जलाशयाच्या परिसरात आढळला महिलेचा मृतदेह

अज्ञाताविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला असल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस (Police) ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर मानोली धरण परिसरात बेवारस स्थितीत पडलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या महिलेचा सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून केला तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांने महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून टाकला असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. बेपत्ता असणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी तसेच घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्याचा विश्वासही पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT