woman molested and killed in amravati saam tv
महाराष्ट्र

अमरावती हादरलं! शेतात बैल चरायला घेवून आलेल्या महिलेवर बलात्कार, दगडाने ठेचून केली हत्या

अमरावती जिल्ह्यात संतापजनक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : जिल्ह्यात धारणी तालुक्यात संतापजनक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. बिरोटी गावात शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्यासाठी आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने वादविवाद केला. दोघांमधील वाद वाढल्याने तरुणाने महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली.पीडित महिलेवर तरुणाने अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडली. या गंभीर प्रकाराबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. सचिन उर्फ रम्मू दारसींभे (२६) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. (woman molested and killed)

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या धारणी तालुक्यात एका तरुणाने महिलेवर बलात्कार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर प्रकारामुळं अमरावती जिल्हा हादरला आहे. शेतात बैल चरायला घेवून आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने अतिप्रसंग करून तिची खून केला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीनं दखल घेवून आरोपीला बेड्या ठोकल्या.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT