पतीशी किरकोळ वाद! महिलेने उचलले टोकाचे पाऊल, दोन मुलांसह केली आत्महत्या Saam TV
महाराष्ट्र

पतीशी किरकोळ वाद! महिलेने उचलले टोकाचे पाऊल, दोन मुलांसह केली आत्महत्या

एक महिन्याचे बाळ आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत आईने आत्महत्या केली आहे.

विजय पाटील

पुणे: सांगलीच्या विटा मध्ये विवाहितेची आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिन्याचे बाळ आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत आईने आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी (Police) पोहचून बॉडी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढली. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून या महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय २६, रा. शाहूनगर, विटा) असे मृत महिलेचे नाव असून सोबत चार वर्षांची मुलगी सोनाली आणि एक महिन्याचे चिमुकले बाळाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना काल सोमवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे. (Sangali Vita Suicide Case)

विटा ते नेवरी रस्त्यावर असलेल्या शिवाजीनगरमधील ओढ्याजवळ एका विहिरीत ४ वर्ष वयाची मुलगी आणि १ महिन्याच्या बाळाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या की अपघात याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान या घटनेची विटा पोलिसांमध्ये नोंद झाली आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, विटा नेवरी रस्त्यालगत शाहूनगर उपनगरामध्ये ढवळेश्वर तलावाकडे जाणाऱ्या ओढ्याच्या पात्रात एक जुनी विहीर आहे. या विहिरीत आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महिलेचा मृतदेह तरंगताना पाहिला.

त्यानंतर लोकांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी आणखी दोन मृतदेह आढळले. यामध्ये एक लहान मुलगी आणि एक बाळ असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून तेथील नागरिकांनी विटा पोलिसांना कळवले. त्यानंतर ओळख पटली आणि ही महिला शाहूनगर येथीलच रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT