Latur : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून विवाहितेवर दोन वर्ष बलात्कार! File Photo
महाराष्ट्र

Latur : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून विवाहितेवर दोन वर्ष बलात्कार!

सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न!

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : लातुर जिल्ह्यातील उदगीर शहरात राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने एका विवाहित महिलेवर गेल्या दोन वर्षापासून दाब, धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील रहिवासी असलेला पण सध्याला उदगीर शहरात राहणाऱ्या या आरोपीने गेल्या दोन वर्षापासून पीडित महिलेस दाब धमकी देऊन सातत्याने बलात्कार केला.

हे देखील पहा :

पोलिसात तक्रार देते म्हटल्यानंतर या महिलेस काही आरोपींकडून धमकी देण्यास लावले. अखेर या बलात्कार पिडीत महिलेने शहर पोलिस ठाणे गाठले व झालेली हकीकत सांगितली. आरोपीने दिलेल्या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ऐकविले. तिच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जळकोट तालुका पदाधिकारी असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बेन यांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाचा दुरुपयोग करत दाब धमकी देऊन गेल्या दोन वर्षापासून शहरातील एका महिलेवर जबरी बलात्कार करून धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना व विरोधी पक्षांनी पुढे येण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो यासाठी सामान्यांचा लढा उभारण्याची गरज असल्याची अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी लातूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी लक्ष घालण्याची मागणी उदगीर च्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT