Crime News saam tv
महाराष्ट्र

Nanded News: छेडछाडीला कंटाळून तरुणीने जीवन संपवलं; नांदेडमधील संतापजनक घटना

मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेडमध्ये एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

उद्धव शिंदे असं छेडछाड करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव मृत तरुणीला रस्त्यावरुन येता-जाता छेडत असे, अश्लील चाळे करत असत. तरुणीने याबाबत कुटुंबियांना देखील सांगितलं होतं. (Latest Marathi News)

मात्र छेडछाडीचा प्रकार थांबला नसल्याने सततच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. तिने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उद्धव शिंदे विरोधात मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT