उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून झोपेतच महिलेचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून झोपेतच महिलेचा मृत्यू

आज सकाळी 5 वाजता तालुक्यातील बाभळगाव येथे ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाथरी - बाभळगाव येथील एका शेतकऱ्याचा ऊस माजलगाव येथील खाजगी साखर कारखान्याला गळपास जात होता. त्यावेळी ऊस घेऊन जाणारा भरधाव ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या घरावर उलटल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 5 वाजता तालुक्यातील बाभळगाव येथे ही घटना घडली आहे.

हे देखील पहा -

अचानक अंगावर कोसळलेल्या उसाच्या मोळ्यांने गाढ झोपेत असलेल्या आजी नातीला हालचाल करता आली नाही. या अपघातात उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून घराती झोपलेल्या एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 8 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन घरावर पडलेल्या उसाच्या मोळ्या बाजूला काढल्या. मात्र, तोपर्यंत पारुबाई पवार यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची नात शिवानी जाधव गंभीर जखमी झाली असून तिच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेत आणखी एक महिला पुष्पा पवार सुदैवाने बचावली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT