धक्कादायक! महिलेची आपल्या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! महिलेची आपल्या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तिघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याने चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला - पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांगेफळ येथील विवाहित महिलेची पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा गजानन काळे २८, मुलगी तनु गजानन काळे ८ , व आठ महिन्याचा लहान मुलगा स्वामी गजानन काळे असे तिघा मृतकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

मृतक विवाहित महिला सोमवार रोजी दुपारी पीठ गिरणी वरून दळण आणण्याचे सांगून एक मुलगी एक मुलगा असे दोघांना घेऊन घरून निघाली होती, परंतु सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, चांगेफळ शेतशिवारातील विहिरीत विवाहित महिला व मुली तसेच लहान मुलगा असे तिघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याने चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला आहे. तिघे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही, पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशन करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

मुलं नव्हे, मुलीच चालवतात खरा वंश; जुना समज विज्ञानानं मोडीत काढला, VIDEO

SCROLL FOR NEXT