चेतन व्यास, वर्धा
Wardha Crime News : नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजीपंत पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सत्याग्रही घाटात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला नेमकी कोण,तिचा मृतदेह सत्याग्रही घाटात कसा आला याचा शोध तळेगाव पोलीस घेत असले तरी याप्रकरणी पोलिसांकडून घातपाताची शक्यताच वर्तविली जात आहे.
तळेगाव येथील रहिवासी भीमराव रमेश सिंगरे हे शनिवारी सरपन गोळा करण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाट परिसरात गेले होते. ते सत्याग्रही घाटात महामार्गालगत असलेल्या भागातून सरपन गोळा करीत असताना राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे ३०० फुट अंतरावर त्यांना महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर भीमराव यांनी तातडीने गावातील नागरिकांना माहिती देत तळेगाव पोलिसांना माहिती दिली. तळेगाव पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत परिसराची बारकाईने पाहणी केली.
शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर मृतक ही ३० ते ४० वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी तातडीने तळेगाव गाठून घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविली जात असल्याने घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. लवकरच या प्रकरणातील कोड सोडवू असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.