black magic Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar : जादुटोणाच्या संशयातून महिलेस मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी चौघांविरुध्द मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनू गावित

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा कुकरखाडीपाडा येथे जादुटोणा (Black Magic) केल्याच्या संशयातून महिलेला हातबांधून स्मशानभूमीत नेत तिच्यावर मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nandurbar Crime News)

अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा कुकरखाडीपाडा येथील एका ४० वर्षीय महिलेवर जादुटोणा करण्याचा संशय घेण्यात आला. या महिलेने जादुटोणा करीत संशयित मोकन्या वसावे यांच्या बहिणीला मारले, असा संशय घेतला. या संशयातून चौघांनी सदर महिलेचे दोरीने हात बांधुन सायंकाळच्या सुमारास स्मशानभूमीत घेवुन गेले.

त्याठिकाणी महिलेला स्मशानभूमीस हात लावण्यास सांगितले. गोल चक्कर मारण्यास सांगत शपथ घेण्यास भाग पाडले. तसेच काठी व नॉयलॉन दोरीने मारहाण करीत महिलेला जखमी करण्यात आले.

याबाबत पिडीत महिलेने मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोकन्या वसावे, हुवलाबाई वसावे, वंती वसावे, रायकीबाई वसावे या चौघांविरुध्द भादंवि कलम ३२३, ३४ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT