Dhiraj Deshmukh Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Dhiraj Deshmukh: काँग्रेस आमदार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. तसेच मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे.

Saam Tv

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संभाजी नगर येथे भेट घेतली. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे व त्यांच्या टीमसोबत मनोज जरांगे पाटील यांच्यावरील उपचाराविषयी जाणून घेतले. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आरक्षण प्रश्नाविषयी चर्चाही केली.

मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी लढाई लढत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी केल्यापासून आणि आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी म्हटले.

...गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा

मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, मनोज जरांगे पाटील यांच्यावर नेमलेली एसआयटी चौकशी रद्द करावी, अशी मागणीही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सरकारकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT